फुलकिड्यांमार्फत वहन केला जाणारा टोमॅटवरील तिरंगा आणणारा व्हायरस हा अलिकडे टोमॅटो आणि अन्य पिकांवरील सर्वात अधिक विनाशकारी रोग बनला आहे. लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांमध्ये फुलकिडे दिसायला लागतात आणि हंगामाच्या शेवटापर्यंत ते दिसतात. त्यांचे जीवनचक्र 14 ते 32 दिवसांचे असते आणि एका वर्षात 12 ते 15 पिढ्या बदलू शकतात.
फुलकिडे मोठ्या संख्येने येतात, ते पाने कुरतडतात आणि पाझरणारा रस शोषून घेतात. ते अन्नभक्षण करत असताना टॉस्पो व्हायरसचे संक्रमण रोपाच्या उतीत होते आणि कोवळ्या पानांवर ठिपके पडून लागण झालेल्या भागात फिकट चंदेरी रंगाचे पट्टे दिसू लागतात, पानांची वरच्या बाजूने गुंडाळी होते आणि फळांवर फिकट तपकिरी रंगाचे चट्टे दिसायला लागतात.
टोमॅटवरील तिरंगा व्हायरसची लक्षणे कोणती?
टोमॅटवरील तिरंगा व्हायरसची लक्षणे वेगवेगळी असू शकतात पण बहुतांश वेळा तांबेरा पडलेल्या पानांच्या रूपात ती दिसू लागतात. नवीन वाढ (नवती) मागच्या दिशेने मरू लागते आणि देठांवर पट्टे दिसू लागतात. बरेचदा लागण झालेल्या रोपांची वाढ एकाच बाजूने होते किंवा वाढ पूर्णपणे खुंटू शकते आणि पाने गळू लागतात. हंगामात सुरवातीला लागण झालेल्या रोपांना फळधारणा होतच नाही,तर फळ लागल्यानंतर लागण झालेल्या रोपांच्या फळांवर हिरवे बांगडीच्या आकाराचे ठिपके पडतात.
हिरव्या फळांवर थोड्या उंचावलेल्या भागांवर हिरवे बांगडीच्या आकाराचे ठिपके पडतात तर पिकलेल्या फळांवर हे अधिक प्रकर्षाने दिसून येतात आणि लाल व पांढर्या किंवा लाल व पिवळ्या रंगाच्या बांगडीच्या आकाराच्या रिंगा पडतात. फळ पूर्ण रंगीत बनल्यावर हे हरितरोगट चट्टे ठळकपणे दिसायला लागतात.
नवीन पाने तपकिरी बनून हिरव्या रंगाच्या रिंगा पडतात. नवीन वाढीवर व देठांवर करपल्यासारखे डाग पडतात. पाने मरायला लागतात. उशीराने लागण झालेल्या रोपांना डागाळ फळे लागतात.
टोमॅटवरील तिरंगा व्हायरसवर उपाय कसा करायचा?
प्रतिबंध हाच टोमॅटवरील तिरंगा आणणार्या व्हायरसवरील उपाय होय. एकदा रोपाला टीएसडब्ल्यूव्हीची लागण झाली की असे व्हायरस संसर्ग झालेले रोप बरे करण्याचे कोणतेही व्यवाहार्य उपाय नसतात. मात्र व्हायरसमुक्त पिकासाठी टोमॅटोच्या रोपांचे सुरवातीच्या काळात रक्षण करणे हाच उपाय असतो. या किडीवर अधिक चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी सिन्जेंटाच्या उत्पादनात उपलब्ध असणारे सर्वोत्तम उपाय वापरा.
व्होलियम फ्लेक्सी हे अद्वितीय बहुगुणकारी कीडनाशक कीटकांच्या प्रादुर्भावापासून पूर्ण संरक्षण देते आणि शिवाय नवीन रोपांना त्यांच्या जीवनचक्राच्या प्रत्येक टप्प्यावर सशक्त आणि सुदृढ बनवते.
टोमॅटो रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर 8-10 दिवसांनी व्होलियम फ्लेक्सी पिकाच्या मुळांशी मातीत ड्रेंचिंग करून द्यायचे असते. यातून पिकाला संरक्षण आणि उत्कृष्ट जोम मिळणे असे दोन्ही लाभ होतात.
सुरवातीच्या कीटकांच्या पुढील जीवनचक्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटो रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर 20-25 दिवसांनंतर अॅलिका वापरा.
अॅलिकामुळे टोमॅटोच्या रोपला उत्तम सुरवात मिळते तसेच सुरवातीची वाढ उत्कृष्ट रीतीने होऊन सुरवातीच्या किडीवर दीर्घकालीन नियंत्रणाचा लाभ मिळतो. यातून टोमॅटोची रोपे जेव्हा टोमॅटवरील तिरंगा आणणार्या व्हायरसची लागण होण्यास सर्वात अधिक संवेदनाशीलअसतात तेव्हाच उत्तम...
टोमॅटोवरील बोकड्या किंवा पिवळा पर्णगुच्छ रोग (टीवायएलसीव्ही) हा पावसाळ्यानंतरच्या किंवा उन्हाळ्यातील टोमॅटो पिकावरील महत्वाचा रोग आहे आणि तो टोमॅटोवरील पांढर्या माशी मार्फत पसरतो. टोमॅटो लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांमध्ये पांढर्या माशा दिसायला लागतात आणि हंगामाच्या शेवटापर्यंत त्या दिसतात.
पिवळा पर्णगुच्छ रोगाव्यतिरिक्त पांढर्या माशांच्या परिणामामुळे इतर दोन प्रकारची हानी होऊ शकते.
थेट हानी पिल्ले आणि पूर्ण वाढ झालेली माशी पानाच्या खालच्या पृष्ठभागावरून रस शोषतात ज्यामुळे पानांचे पिवळे पडणे खालच्या बाजूला गुंडाळी होणे अणि मर होणे घडते, पिकाची वाढ खुंटते ज्यामुळे अखेरीस उत्पादनात मोठे नुकसान येते.
अप्रत्यक्ष हानी पांढर्या माशा पिकावर चिकट व गोड पदार्थ उत्सर्जित करतात आणि त्यातून राखाडी बुरशी तयार होते. राखाडी बुरशीमुळे रोपांचे प्रकाश संश्लेषण थांबते आणि उत्पादन आणि फळाचा दर्जा कमी होतो.
टोमॅटवरील पिवळा पर्णगुच्छ रोगाची लक्षणे कोणती?
पर्णगुच्छ रोगाचे लक्षण म्हणजे रोपांची वाढ खुंटते आणि पाने खालच्या दिशेने गुंडाळी होऊन सुरकुतलेली दिसतात. नवीन तयार होणार्या पानांवर पांढरे चट्टे दिसून येतात तर इतर जुनी गुंडाळी झालेली पाने खरबरीत आणि ठिसूळ बनतात. रोपांची वाढ खुंटते कारण शाखीय वाढ कमी होते. रोग झालेली रोपे मलूल दिसतातआणि आडव्या फांद्या अधिक आल्यामुळे झुडपांसारखी वाढ होते. रोपे संपूर्णतः वांझोटी बनतात.
-पानांच्या कडा आतल्या बाजूने वळतात.
-पाने जाड बनून त्यांना खरबरितपणा येतो आणि खालची बाजू जांभळी बनते.
-शाखीय वाढ कमी होऊन रोपांची वाढ खुंटते आणि झुडपासारखी दिसू लागतात.
टोमॅटवरील पिवळा पर्णगुच्छ रोगावर उपाय कसा करायचा?
टोमॅटवरील पांढर्या माशीवरील आणि टोमॅटवरील पिवळा पर्णगुच्छ रोगाच्या नियंत्रणासाठीचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे एकात्मिक कीडनियंत्रण दृष्टिकोन ठेवणे ज्यात कीटकनाशकांचा वापर, रोगप्रतिकारकशक्ती असणारे वाण वापरणे आणि जैविक उपाययोजना करणे यांचा समावेश होतो.
वाढ झालेले कीटक आणि पिल्ले या दोन्हींवर लागू असणार्या पेगॅसस 50 डब्ल्यूपीचा वापर करून टोमॅटोवरील पांढर्या माशीवर नियंत्रण ठेवता येते. पेगॅसस तिहेरी म्हणजेच संपर्क, स्थानीय आंतरप्रवाही आणि गॅसद्वारे कृती करते आणि त्याच्यामुळे कीटकांच्यात प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याच्या कोणत्याही समस्या येत नाहीत. प्रभावी आणि दीर्घकालीन नियंत्रणासाठी पांढर्या...