You are here

अटी व शर्ती

www.syngenta.co.in साईटवर आपले स्वागत आहे. सिंजेंटा आणि त्यांची उत्पादने व सेवांबाबत सर्वसाधारण माहिती देण्यासाठी ही वेब साईट बनविली आहे. या अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अटीवर तुम्ही ही वेब साईट वापरू शकता.

 

या अटी व शर्तींसाठी तुमची स्वीकृती

 

या अटी व शर्तींचा काळजीपूर्वक आढावा घेण्यासाठी कृपया काही मिनिटे वेळ द्या. ही वेब साईटवर प्रवेश करून आणि ती वापरून तुम्ही या अटी व शर्तींचे पालन करण्याचे व त्यासाठी बांधील राहण्याचे मान्य करता. जर तुम्ही या अटी व शर्तींचे पालन करण्याचे व त्यासाठी बांधील राहण्याचे मान्य करत नसाल, तर तुम्ही या वेब साईटवर प्रवेश करू शकत नाही, त्यावरील साहित्य वापरू किंवा डाउनलोड करू शकत नाही.

 

या अटी व शर्ती बदलू शकतात

 

कोणत्याही पूर्वसूचनेविना कोणत्याही वेळी या अटी व शर्ती अद्यतन करण्याचे किंवा त्यात बदल करण्याचे अधिकार सिंजेंटा राखून ठेवते. अशा कोणत्याही बदलानंतर या वेब साईटचा तुमचा वापर म्हणजे बदललेल्या अटी व शर्तींचे पालन करण्याचे आणि त्याद्वारे बांधील राहण्याचे तुम्ही मान्य करता असा होतो. या कारणामुळे, दर वेळी तुम्ही ही वेब साईट वापराल, तेव्हा तुम्ही या अटी व शर्तींचा आढावा घ्यावा असे आम्ही सुचवतो.

 

कॉपीराईट सूचना आणि मर्यादित परवाना

 

या वेब साईटवर तुम्ही पाहात आणि ऐकत असलेले सर्वकाही (“सामग्री”), युनायटेड स्टेट्सचा कायदा आणि लागू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉपीराईट कायदे व करारातील तरतुदींनुसार कॉपीराईट अंतर्गत येते, उदाहरणार्थ सर्व मजकूर, छायाचित्रे, उदाहरणे, ग्राफिक्स, ऑडिओ क्लिप्स, व्हिडिओ क्लिप्स आणि ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स. सामग्रीतील कॉपीराईट्स सिंजेंटा कॉर्पोरेशन किंवा त्यांच्या एका संलग्न संस्था किंवा सिंजेंटाला आपले साहित्य परवान्याने दिलेल्या त्रयस्थ पक्षांच्या मालकीचे आहेत. या साईटवरील संपूर्ण सामग्री युनायटेड स्टेट्सचा कायदा आणि लागू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉपीराईट कायदे व करारांनुसार एकत्रित कार्य म्हणून कॉपीराईटच्या अंतर्गत येते आणि आशयाची निवड, समन्वय साधणे, व्यवस्था आणि वृद्धीचे कॉपीराईट सिंजेंटाच्या मालकीचे आहेत.

 

या साईटवरील सामग्रीचे निवडक भाग तुम्ही डाउनलोड, संग्रहित, मुद्रित व प्रतिलिपी करू शकता, जर तुम्ही:

• डाउनलोड केलेली सामग्री केवळ तुमच्या वैयक्तिक, अव्यावसायिक वापरासाठी किंवा सिंजेंटासह तुमच्या व्यवसायाच्या व्यवहारांमध्ये पुढे वापरणार असाल 
• सामग्रीचा कोणताही भाग तुम्ही इतर कोणत्याही इंटरनेट साईटवर प्रकाशित किंवा पोस्ट करणार नसाल;

सामग्रीचा कोणताही भाग तुम्ही कोणत्याही इतर माध्यमावर किंवा मध्ये प्रकाशित किंवा प्रसारित करणार नसाल;
 
कोणत्याही प्रकारे तुम्ही सामग्रीत बदल किंवा सुधारणा करणार नाही किंवा कॉपीराईट किंवा व्यापारचिन्हाच्या सूचना किंवा गोपनीयतेच्या सूचना हटवणार किंवा बदलणार नाही.
 
वर व्यक्तपणे नमूद केलेले असल्याशिवाय, सिंजेंटाकडून प्रथम लेखी परवानगी मिळवल्याशिवाय सामग्रीचा सर्व किंवा कोणताही भाग तुम्ही कॉपी, डाउनलोड, मुद्रित, प्रकाशित, प्रदर्शित, वितरित, हस्तांतरित, स्थानांतरित, भाषांतरित, सुधारित करणार नाही, कशात जोडणार, अद्यतन, संकलित करणार नाही.
 
वर व्यक्तपणे नमूद केलेले असल्याशिवाय, तुम्ही या साईटवरून सामग्री डाऊनलोड करता तेव्हा, डाउनलोड केलेल्या सामग्रीतील कोणताही अधिकार, शीर्षक किंवा स्वारस्य तुमच्याकडे हस्तांतरित होत नाही. वर मंजूर केलेल्या मर्यादित, अनन्य परवान्या व्यतिरिक्त, या अटी व शर्तींमधील किंवा या वेब साईटवरील काहीही परवाना दिला म्हणून गणले जाणार नाही, मग ते निहित, प्रतिष्टंभ किंवा अन्यथा असले किंवा कोणत्याही कॉपीराइट, व्यापारचिन्ह, पेटंट किंवा सिंजेंटा किंवा कोणत्याही तृतीय पक्षाचा अन्य बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांतर्गत असले तरीही.

 

व्यापारचिन्ह सूचना

 

या वेब साईटवर प्रदर्शित केलेली सर्व व्यापारचिन्हे, सेवा चिन्हे आणि लोगो (“व्यापारचिन्ह(न्हे)”) सिंजेंटा, त्यांच्या संलग्न संस्थांपैकी एक किंवा त्रयस्थ पक्षांची नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत व्यापारचिन्हे आहेत, ज्यांनी त्यांची व्यापारचिन्हे सिंजेंटा किंवा त्यांच्या संलग्न संस्थांपैकी एकीला परवान्याने दिलेली आहेत.

या अटी व शर्तींमध्ये व्यक्तपणे  नमूद केलेले असल्याशिवाय, सिंजेंटाची लेखी परवानगी घेतल्याशिवाय, तुम्ही कोणतेही व्यापारचिन्ह पुनरुत्पादित, प्रदर्शित करू शकत नाही किंवा अन्यथा वापरू शकत नाही

 

अप्रत्याशित कल्पना

 

या वेब साईटबाबत तुमच्या टिप्पण्या, व अभिप्रायाचे सिंजेंटा स्वागत करते. या वेब साईटद्वारे सिंजेंटाकडे सादर केलेली सर्व माहिती व साहित्य गोपनीय नसलेले आणि मालकीचे नसलेले मानले जाईल, जसे की कोणत्याही टिप्पण्या, अभिप्राय, कल्पना, प्रश्न, रचना, डेटा किंवा पसंती. या कारणामुळे, आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही आम्हाला अशी कोणतीही माहिती किंवा साहित्य पाठवू नये, जे आम्हाला नियुक्त करण्याची तुमची इच्छा नसेल, यामध्ये, कोणत्याही मर्यादेविना, उत्पादनाच्या कल्पना, संगणकाचा संकेतांक किंवा मूळ कलाकृती यांच्यासारख्या कोणत्याही गोपनीय माहिती किंवा मूळ सर्जनशील साहित्याचा समावेश होतो.
या वेब साईटद्वारे सिंजेंटाशी संवाद साधून आणि/किंवा साहित्य सादर करून, तुम्ही सादर करत असलेल्या माहिती आणि/किंवा साहित्यातील सर्व कॉपीराईट्स आणि इतर बौद्धिक मालमत्ता अधिकारांमधील जगभरातील सर्व अधिकार, शीर्षक व स्वारस्य तुम्ही सिंजेंटाला मोफत सोपविता. या वेब साईटद्वारे तुम्ही सादर करत असलेली कोणतीही माहिती आणि/किंवा साहित्य आणि अशा कोणत्याही माहिती आणि/किंवा साहित्यातील कोणतीही कल्पना, संकल्पना, कृतीचे ज्ञान किंवा तंत्रे ज्या असतील त्या कोणत्याही उद्देशासाठी वापरण्याचा सिंजेंटाला अधिकार असेल, यामध्ये अशी माहिती किंवा साहित्य कोणत्याही निर्बंधाविना किंवा तुम्हाला कोणतीही भरपाई न देता वापरून उत्पादने विकसित, उत्पादित करणे व त्यांचे विपणन करण्याचा समावेश आहे, परंतु ते तेवढ्यासच मर्यादित नाही.

तथापि, या वेब साईटद्वारे तुम्ही सादर करत असलेली कोणतीही माहिती सिंजेंटा अशा प्रकारे वापरणार नाही की ज्यामुळे लागू होणाऱ्या गोपनीय कायद्यांचे उल्लंघन होईल. विशेषतः, सिंजेंटा तुमचे नाव प्रकाशित करणार नाही किंवा अन्यथा या वस्तुस्थितीला प्रसिद्धी देणार नाही की ती माहिती किंवा साहित्य तुम्ही आमच्याकडे सादर केले आहे, जोपर्यंत: (अ) तुमचे नाव वापरण्यासाठी आम्ही तुमची परवानगी घेत नाही; किंवा (ब) आम्ही प्रथम तुम्हाला सूचित करत नाही की या साईटच्या विशिष्ट भागामध्ये तुम्ही सादर केलेले साहित्य किंवा इतर माहिती तुमच्या नावासकट प्रकाशित केली जाईल किंवा अन्यथा वापरली जाईल; किंवा (क) कायद्याने आम्ही तसे करणे आवश्यक असेल.

या वेब साईटद्वारे तुम्ही सादर करत असलेल्या माहिती आणि इतर सामग्रीसाठी तुम्ही जबाबदार आहात, यामध्ये, कोणत्याही मर्यादेविना, त्यांच्या सत्यता आणि अचूकतेचा समावेश होतो.

 

तृतीय-पक्ष माहिती

 

या वेब साईटद्वारे उपलब्ध असलेली काही माहिती, लेख आणि इतर साहित्य त्रयस्थ-पक्षांद्वारे सिंजेंटाला दिली जाते, यामध्ये त्रयस्थ-पक्षाच्या बातम्या आणि साठा दरपत्रक सेवांचा समावेश होतो. आमच्या मते, जेव्हाही व्यावहारिक असेल, तेव्हा या त्रयस्थ-पक्ष साहित्यांचा स्रोत ओळखला जातो. हे त्रयस्थ-पक्ष साहित्य केवळ तुमच्या स्वारस्य व सोयीसाठी प्रदान केले जाते. हे साहित्य किंवा आम्हाला त्याचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांना सिंजेंटा पुष्टी करत नाही किंवा हे साहित्य वर्तमान, अचूक, पूर्ण किंवा विश्वसनीय असल्याची सिंजेंटा हमी देत नाही व तसे प्रतिनिधित्व करत नाही. त्रयस्थ पक्षाने दिलेल्या माहितीच्या वापराची कोणतीही जबाबदारी सिंजेटा स्वीकारत नाही.

 

इतर वेब साईट्सच्या लिंक्स

 

या साईटवर अशा वेब साईट्सच्या हायपरलिंक्स आहेत ज्यांचे परिचालन सिंजेंटाद्वारे केले जात नाही. या हायपरलिंक्स केवळ तुमच्या संदर्भासाठी व सोयीसाठी प्रदान केल्या जातात आणि या त्रयस्थ-पक्ष वेब साईट्सच्या साहित्याला मान्यता देत असल्याचे किंवा त्यांच्या चालकांसह त्यांचा काहीही संबंध असल्याचे यातून सूचित होत नाही. सिंजेंटा या वेब साईट्स नियंत्रित करत नाही आणि त्यांच्या आशयासाठी जबाबदार नाही. या वेब साईट्सवरील तुमचा प्रवेश व वापर तुमच्या स्वतःच्या जोखमीवर आहे.

 

उत्पादनाची माहिती

 

या वेब साईटवर असलेली किंवा संदर्भ दिलेली कोणतीही माहिती केवळ सिंजेंटा व त्यांच्या उत्पादने आणि सेवांच्या प्रस्तुतीकरणासाठी अनुरूप आहे आणि त्या व्यतिरिक्त तिचा अर्थ लावला जाऊ नये. आमच्या उत्पादने आणि सेवांशी संबंधित विशिष्ट सल्ला आणि सूचनांसाठी, कृपया थेट सिंजेंटाशी संपर्क साधावा. पीक संरक्षण किंवा बियाणे उत्पादन वापरण्याचा हेतू असलेल्या व्यक्तींनी त्या उत्पादनासह असलेले लेबल वाचावे व त्याचे अनुसरण करावे आणि त्या उत्पादनाच्या वापराबाबत लागू होणाऱ्या सर्व कायदे व नियमनांचे पालन करावे. कोणतेही पीक संरक्षण उत्पादन वापरण्यापूर्वी, ते तुमच्या देशात नोंदणीकृत असल्याची खात्री करा.

 

जागतिक उपलब्धता

 

जगभरातील विविध देशांमध्ये भिन्न कायदे व नियामक आवश्यकता असल्यामुळे, काही उत्पादने काही देशांमध्ये उपलब्ध आहेत आणि इतर देशांत उपलब्ध नाहीत. या साईटवर सिंजेटाची उत्पादने, कार्यक्रम व सेवांबाबत संदर्भ किंवा पडताळणीचे संदर्भ आहेत, जे तुमच्या देशात उपलब्ध नसू शकतात किंवा कदाचित त्यांची तिथे घोषणा केली जाणार नाही. हे संदर्भ, ती उत्पादने, कार्यक्रम व सेवांची तुमच्या देशात घोषणा करण्याचा सिंजेंटाचा हेतू आहे असे सूचित करत नाहीत. तुमच्यासाठी कोणती उत्पादने, कार्यक्रम आणि सेवा उपलब्ध असू शकतात याबाबत तुम्हाला शंका असल्यास तुमच्या स्थानिक सिंजेंटा विक्री प्रतिनिधीचा सल्ला घ्या किंवा सिंजेंटाशी संपर्क साधा.

 

वेब साईटमध्ये बदल करण्याचा अधिकार

 

कोणत्याही प्रकारे, कोणत्याही वेळी, कोणत्याही कारणास्तव, पूर्व सूचनेविना या वेब साईटवरील आशय आणि कार्यक्षमता कोणत्याही प्रकारे बदलण्याचे किंवा या वेब साईटचा प्रवेश मर्यादित करण्याचे किंवा ही वेब साईट बंद करण्याचे अधिकार सिंजेंटा राखून ठेवते आणि अशा बदलांच्या संभाव्य परिणामांसाठी कोणत्याही प्रकारे उत्तरदायी नसेल. 

 

गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव किंवा आमंत्रण नाही

 

या वेब साईटवरील माहिती सिंजेंटाच्या शेअर्स किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याचा किंवा अन्यथा व्यवहार करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा आमंत्रण नाही आणि तसे समजले जाणार नाही. असा कोणताही प्रस्ताव किंवा आमंत्रण दिले जात नाही किंवा तसा आग्रह केला जात नाही. शेअरच्या किमती आणि त्या शेअर्समधून उत्पन्न कोणत्याही वेळी कमी-जास्त होऊ शकते आणि संभाव्य गुंतवणूकदारांना याची जाणीव असावी की पूर्वीची कामगिरी हा भविष्यातील कामगिरीचा संकेत असेलच असे नाही. संभाव्य गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतंत्र आर्थिक सल्ला घ्यावा.

 

भविष्याचा वेध घेणारी विधाने

 

आमच्या वेबसाईटवर भविष्याचा वेध घेणारी विधाने असू शकतात - म्हणजेच, ऐतिहासिक तथ्य नसलेली विधाने, ज्यात आमच्या विश्वास आणि अपेक्षांच्या विधानांचाही समावेश होतो. ही विधाने चालू योजना, अंदाज आणि प्रक्षेपणांवर आधारित असतात आणि त्यामुळे वाचकांनी त्यावर अवास्तव विश्वास ठेवू नये. या विधानांमध्ये अंगभूत जोखमी आणि अनिश्चितता असतात, ज्यांपैकी अनेक सिंजेंटाच्या नियंत्रणाबाहेर असतात. यू.एस. सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशनकडे दाखल केलेल्या कागदपत्रात, काही ठराविक घटक आमच्या लक्षात आले आहेत, ज्यामुळे या भविष्याचा वेध घेणाऱ्या विधानांमध्ये असलेल्यांहून प्रत्यक्ष परिणाम भिन्न ठरू शकतात. भविष्याचा वेध घेणारी विधाने केवळ ती ज्या तारखेला केली जातात, त्यानुसार बोलतात आणि नवीन माहितीच्या प्रकाशात किंवा भविष्यातील घटनांनुसार ती अद्यतन करण्याचे कोणतेही दायित्व आम्ही घेत नाही.

 

हमींची अस्वीकृती

 

ही वेब साईट “आहे तशी,” “जशी उपलब्ध आहे” तत्वावर, कोणत्याही प्रकारच्या हमींशिवाय प्रदान केलेली आहे. लागू असलेल्या कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल संभाव्य मर्यादेपर्यंत, सिंजेंटा आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्या, व्यक्त, सूचित किंवा वैधानिक अशा सर्व हमींचा अस्वीकार करतात, यामध्ये विक्रीयोग्यतेच्या सूचित हमी, विशिष्ट उद्देशासाठी औचित्य आणि उल्लंघन न करणे याचाही समावेश होतो, परंतु ते तेवढ्यासच मर्यादित नाही. आधीच्या विधानाची मर्यादा लक्षात न घेता, सिंजेंटा असे प्रतिनिधित्व करत नाही किंवा हमी देत नाही की ही वेब साईट कोणत्याही विशिष्ट वेळी किंवा स्थानी उपलब्ध असेल किंवा तिचे परिचालन विनाव्यत्यय आणि त्रुटी मुक्त असेल. सिंजेंटा असे प्रतिनिधित्व करत नाही किंवा हमी देत नाही की या साईटवरील सामग्री व्हायरस, वर्म्स किंवा इतर कोडपासून मुक्त आहे जे मालमत्ता दूषित करणारे किंवा विध्वंसक गुणधर्म वाढवू शकतात. अचूक आणि अद्ययावत माहिती प्रदान करण्याचे जरी सिंजेंटाने पूर्ण प्रयत्न केले असले, तरी या वेब साईटवर प्रकाशित केलेली माहिती अपूर्ण किंवा कालबाह्य असू शकते आणि त्यामध्ये चुका किंवा टाईपिंगच्या त्रुटी असू शकतात. ही वेब साईट किंवा या वेब साईटवर प्रकाशित कोणत्याही माहितीचा वापर, वैधता, अचूकता, चलन किंवा विश्वासार्हतेबाबत किंवा वापराच्या निकालांबाबत किंवा अन्यथा सिंजेंटा हमी देत नाही किंवा कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही.

 

दायित्वाची मर्यादा

 

या वेब साईटचा तुमचा वापर तुमच्या एकमेव जोखमीवर आहे. या वेब साईटमध्ये तुमच्या प्रवेशामुळे, वापरामुळे किंवा वापरता न आल्यामुळे किंवा या वेब साईटवर दिलेल्या कोणत्याही माहितीवरील तुमच्या विश्वासामुळे, होणाऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तोटे किंवा नुकसानांसाठी, कोणत्याही परिस्थितींत, सिंजेंटा, त्यांच्या संलग्न संस्था किंवा त्यांचे कोणतेही संबंधित संचालक, अधिकारी, कर्मचारी किंवा एजंट उत्तरदायी नसतील. आधीच्या विधानाची मर्यादा लक्षात न घेता, या साईटवरील सामग्रीतील संभाव्य त्रुटी किंवा ती वगळली जाण्याच्या संभाव्य त्रुटींसाठी सिंजेंटा उत्तरदायी नसेल; हे विशेषतः सिंजेंटाद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या उत्पादने आणि सेवांच्या कोणत्याही संदर्भांना लागू होते. ही दायित्वाची सर्वसमावेशक मर्यादा आहे जी कोणत्याही प्रकारच्या, ज्या असतील त्या, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, सामान्य, विशेष, प्रायोगिक, व्यावसायिक, नमुनेदार किंवा इतर तोटे किंवा नुकसानांना किंवा अन्यथा, मर्यादेविना, डेटा, महसूल किंवा नफ्याच्या नुकसानांस लागू होते. आरोपित दायित्व करार, निष्काळजीपणा, क्षति, काटेकोर दायित्व किंवा इतर कोणत्याही आधारावर असले आणि अगदी सिंजेंटा किंवा त्यांच्या संलग्न संस्थाच्या अधिकृत प्रतिनिधीला अशा संभाव्य नुकसानांबाबत सल्ला दिलेला असला किंवा त्याबाबत माहीत असले तरीही ही दायित्वाची मर्यादा लागू होते.

काही देश किंवा ठराविक देशांचे काही राजकीय उपविभाग वर निश्चित केलेल्या दायित्वाच्या मर्यादेला परवानगी देत नाहीत, त्यामुळे दायित्वाची मर्यादा कदाचित तुम्हाला लागू होणार नाही. या दायित्वाच्या मर्यादेचा कोणताही भाग, कोणत्याही कारणास्तव अवैध किंवा अप्रवर्तनीय आढळल्यास, अशा अन्यथा मर्यादित राहिल्या असत्या अशा दायित्वाच्या परिस्थितींमध्ये सिंजेंटा आणि/किंवा त्यांच्या संलग्न संस्थांचे एकत्रित दायित्व शंभर ($100.00) डॉलर्सहून जास्त असणार नाही.

 

संपूर्ण करार

 

या वेब साईटमध्ये प्रवेश करणे आणि/किंवा ती वापरणे यासंबंधित तुम्ही आणि सिंजेंटामधील संपूर्ण करार हा करार तयार करतो.

 

प्रभावी तारीख

 

वर निश्चित केलेल्या अटी व शर्ती जानेवारी 2016 पासून प्रभावी आहेत.

 

नियामक कायदा

 

वर निश्चित केलेल्या अटी व शर्तींचे नियमन भारताच्या कायद्यांनुसार होईल आणि त्या त्यांच्या अधिन असतील व या करारातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादावर खटला चालविण्याचे पुण्यातील न्यायालयांचे विशेष न्यायाधिकारक्षेत्र असेल.