प्रस्तावना
www.syngenta.co.in (“साईट”) ची मालकी सिंजेंटा इंडिया लिमिटेडकडे (“सिंजेंटा”) असून ती ही वेबसाईट चालविते. सिंजेंटा तिच्या साईटला भेट देणाऱ्या व्यक्तींच्या गोपनीयतेची कदर करते आणि ही साईट वापरणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक गोपनीयतेबाबत कायदेशीर आवश्यकतांचा आदर करण्यास वचनबद्ध आहे. या साईटवर सिंजेंटाद्वारे गोळा केल्या जाणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या संदर्भात सिंजेंटाची वर्तमान धोरणे व पद्धतींबाबत या गोपनीयता विधानात वर्णन केलेले आहे.
व्याख्या:
या धोरणात, “सिंजेंटा” याचा अर्थ सिंजेंटा इंडिया लिमिटेड आणि तिच्या सहाय्यक कंपन्या व संलग्न संस्था असा होतो. “साईट” याचा अर्थ www.syngenta.co.in “वैयक्तिक डेटा” म्हणजेच ओळखलेल्या किंवा ओळखता येणाऱ्या नैसर्गिक किंवा कायदेशीर व्यक्तीशी संबंधित माहिती, उदाहरणार्थ, व्यक्तीचे नाव, वय, ई-मेल पत्ता किंवा टपाली पत्ता असा होतो.
तुमची संमती:
हे गोपनीयता विधान www.syngenta.co.in आणि वापराच्या अटींमध्ये समाविष्ट आहे व त्याचा भाग आहे. ही साईट वापरून, तुम्ही या गोपनीयता विधानात निश्चित केल्यानुसार, तुमच्या वैयक्तिक डेटाचे संकलन, वापर व प्रगटीकरणास संमती देत आहात. तथापि, हे, या साईटवर प्रकाशित केल्या जाऊ शकणाऱ्या वैयक्तिक डेटाशी संबंधित विशिष्ट विधानांच्या अधीन आहे. वैयक्तिक डेटाबाबत अशी विशिष्ट विधाने प्रत्यक्षात पुरविल्यास, या गोपनीयता विधानाबाबत कोणताही विसंवाद निर्माण झाल्यास, ती वरचढ ठरतील.
या गोपनीयता धोरणातील बदलाबाबत सूचना:
"सिंजेंटा या साईटमध्ये सातत्याने सुधारणा करण्याचे आणि नवीन कार्यक्षमता व वैशिष्ट्ये जोडण्याचा प्रयत्न करत असते. सातत्याने चालू असलेल्या या सुधारणा, कायद्यातील बदल किंवा तंत्रज्ञानातील बदल यांच्यामुळे या गोपनीयता विधानात बदल करावे लागू शकतात.
कोणत्याही सूचनेविना कोणत्याही वेळी हे गोपनीयता विधान अद्यतनीत करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार सिंजेंटा राखून ठेवते. या कारणामुळे, तुम्ही ही साईट वापराल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही या गोपनीयता विधानाचा आढावा घ्यावा, असे आम्ही सुचवतो. या साईटच्या प्रत्येक पृष्ठाच्या तळाशी असलेल्या "गोपनीयता विधान"" बटणावर क्लिक करून, या गोपनीयता विधानाची वर्तमान आवृत्ती तुम्ही कधीही पाहू शकता.
अशा कोणत्याही बदलानंतर तुमच्याद्वारे या साईटचा वापर, सुधारित गोपनीयता विधान पोस्ट केल्यानंतर ‘या साईटद्वारे तुमच्याकडून किंवा तुमच्याबद्दल गोळा केलेला वैयक्तिक डेटा सुधारित गोपनीयता विधानाच्या अटींच्या अधीन असेल’ या बाबीस तुमची मान्यता दर्शवतो. तथापि, या साईटवर सुधारित गोपनीयता विधान पोस्ट केले जाण्यापूर्वी, सिंजेंटाद्वारे गोळा केल्या गेलेल्या कोणत्याही वैयक्तिक डेटाला या गोपनीयता विधानातील बदल लागू होणार नाहीत."
वेबसाईटद्वारे गोळा केलेला वैयक्तिक डेटा:
i. तुम्ही पुरवीत असलेला वैयक्तिक डेटा:
"तुम्ही ही साईट वापरता तेव्हा तुम्ही आम्हाला देत असलेला वैयक्तिक डेटा सिंजेंटा गोळा करते. उदाहरणार्थ, या वैयक्तिक डेटामध्ये, तुमचे नाव, तुमच्या कंपनीचे नाव, तुमचा किंवा तुमच्या कंपनीचा टपाली पत्ता आणि तुमचा ई-मेल पत्ता समाविष्ट असू शकतो. या गोपनीयता विधानातील आशयाच्या अधीन तुमचा वैयक्तिक डेटा काटेकोरपणे गोपनीय ठेवला जाईल. जेव्हा तुम्ही या साईटचा वापर करता तेव्हा तुम्ही मागितलेली माहिती, सेवा व उत्पादने पुरविण्यासाठी सिंजेंटा तुम्ही दिलेला वैयक्तिक डेटा वापरते. उदाहरणार्थ, तुमच्या टिप्पण्या व प्रश्नांना प्रतिसाद देण्यासाठी आम्ही तुमचा ई-मेल पत्ता वापरू शकतो. काही प्रकरणांमध्ये, प्रचारात्मक कार्यक्रमांसाठी नोंदणी करण्यास साईट परवानगी देऊ शकते; माहिती पत्रके, नकाशे व कार्यक्रमाची माहिती पाठविण्यासाठी आम्ही तुमचा ईमेल किंवा टपाली पत्ता वापरू.
या साईटची सामग्री व कार्यक्षमता सुधारण्यासाठी, आमचे ग्राहक व बाजारपेठा चांगल्या रीतीने समजावून घेण्यासाठी, आमची उत्पादने व सेवा सुधारण्यासाठी आणि या साईटच्या नोंदणीकृत वापरकर्त्यांसह, आमचे ग्राहक व संभाव्य ग्राहक यांना आमच्या उत्पादने व सेवांचे विपणन करण्यासाठीसुद्धा सिंजेंटा या साईटद्वारे गोळा केलेला वैयक्तिक डेटा वापरते. वेळोवेळी, कृषी उत्पादने व सेवांबाबत माहितीसह आम्ही तुमच्याशी संपर्क साधू शकतो. अशा उद्देशांसाठी आम्ही तुमच्याशी संपर्क करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया आमच्या वेबमास्टरद्वारे आम्हाला सूचित करा."
ii. क्लिक-स्ट्रीम डेटा:
या साईटच्या तुमच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी सिंजेंटा तंत्रज्ञान वापरते, उदाहरणार्थ, तुम्ही कोणती पृष्ठे पाहता आणि कोणत्या लिंक्स वापरता. या साईटच्या तुमच्या वापराबाबतच्या या माहितीस "क्लिक-स्ट्रीम डेटा” असे म्हणतात. तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे व काय नाही हे ठरवण्यास क्लिक-स्ट्रीम डेटा आम्हाला मदत करतो. कोणती सामग्री व वैशिष्ट्ये जोडावी आणि कोणती काढून टाकावी हे ठरविण्यास आम्हाला यामुळे मदत मिळते. आमची साईट वापरण्यास सुलभ आहे का किंवा काही विशिष्ट पृष्ठे व लिंक्सची आम्ही पुनर्रचना करणे आवश्यक आहे का हे ठरवण्यासही आम्हाला यामुळे मदत मिळते. क्लिक-स्ट्रीम डेटा सहसा तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत नाही. जर सिंजेंटाने कोणताही क्लिक-स्ट्रीम डेटा तुमच्या वैयक्तिक नावासह संलग्न केला, तर आम्ही तो वैयक्तिक डेटा म्हणून हाताळू.
iii. कुकीज:
"तुमच्या संगणकावर आमचे स्वतःचे मार्कर स्थापित करून आम्ही तुमच्याबद्दल माहिती मिळवू शकतो. या मार्करना सामान्यपणे "कुकी"" असे म्हटले जाते आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला संगणक-निर्मित, वैशिष्ट्यपूर्ण ओळखकर्त्याद्वारे ओळखू शकतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर कुकी म्हणजे एक लहान डेटा फाईल असते. साईटला भेट दिली जाते तेव्हा वेबसाईट्स त्या साईट अभ्यागताच्या हार्ड ड्राईव्हवर सामान्यपणे ती लिहितात. कुकी फाईलमध्ये अशी माहिती असते जी एखादा अभ्यागत जेव्हा परत आमच्या साईटला भेट देतो तेव्हा त्याला किंवा तिला ओळखू शकते. अतिरिक्त सुरक्षेसाठी डेटा एनक्रिप्ट केलेला असतो. अभ्यागतांचा अनुभव निरंतर सुधारण्यासाठी कृती व रहदारीचा आकृतीबंध मोजण्याचा मार्ग म्हणून सिंजेंटाची साईट कुकी वापरू शकते. उदाहरणार्थ, एखादे उत्पादन तुम्ही एकदा खरेदी केल्यानंतर, तुम्हाला ते पुन्हा खरेदी करायचे असेल, तर आकारमान, रंग किंवा इतर वैशिष्ट्यांबाबत तुमची आधीची निवड साठवून ठेवली जाईल आणि जास्त पटकन पुन्हा प्रविष्ट केली जाईल, ज्यायोगे तुमचा वेळ व कष्ट वाचतील.
तुमचा संगणक कुकीज नाकारण्यासाठी खास कॉन्फिगर केलेला असू शकतो: अधिक माहितीसाठी कृपया तुमचा ब्राउझर पाहावा. तुम्हाला कुकी प्राप्त करण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही कुकीज नाकारण्यासाठी किंवा तुमच्या संगणकावर कुकी ठेवली जाईल तेव्हा सतर्क करण्यासाठी तुमचा ब्राउझर सेट करू शकता. तुम्ही साईटवरून बाहेर पडताच कुकीज हटवूही शकता. तुम्ही आमच्या साईट्सना भेट देता तेव्हा तुम्ही कुकीज स्वीकारणे आवश्यक नसले, तरी जर तुम्ही तुमचा ब्राउझर कुकीज नाकारण्यासाठी सेट केला असेल, तर तुम्ही आमच्या साईट्सची सर्व वैशिष्ट्ये व कार्यक्षमता वापरू शकणार नाही.”"
या साईटद्वारे संकलित केलेल्या वैयक्तिक डेटाचे प्रगटीकरण:
i. आमच्या संलग्न संस्थांकडे वैयक्तिक डेटाचे प्रगटीकरण:
या साईटद्वारे संकलित केलेला वैयक्तिक डेटा सिंजेंटा आपल्या सहाय्यक कंपन्या आणि संलग्न संस्थांना देऊ शकते, ज्या तो वैयक्तिक डेटा सिंजेंटा ज्याप्रकारे वैयक्तिक डेटा वापरते त्याचप्रमाणे वापरू शकतात (म्हणजे आमच्या गोपनीयता विधानानुसार). जर सिंजेंटाने तुमचा वैयक्तिक डेटा आपल्या सहाय्यक कंपन्या व संलग्न संस्थांना देऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल, तर कृपया आमच्या वेबमास्टरद्वारे आम्हाला सूचित करा.
ii. असंबंधित त्रयस्थ-पक्षांकडे वैयक्तिक डेटाचे प्रगटीकरण:
या साईटद्वारे संकलित केलेला वैयक्तिक डेटा, सिंजेंटा, तिच्या सहाय्यक कंपन्या आणि संलग्न संस्था जगभरातील अशा त्रयस्थ-पक्षांसह सामायिक करू शकतात, जे सिंजेंटा आणि/किंवा त्यांच्या सहाय्यक कंपन्या आणि संलग्न संस्थांसाठी किंवा त्यांच्या वतीने काम करतात, उदाहरणार्थ, आम्हाला सहयोग सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या, सोबत यात डेटावर प्रक्रिया करणाऱ्या सेवा, किंवा आमची उत्पादने आणि सेवांचे विपणन करण्यास मदत करणाऱ्यांचा समावेश होतो. या कंपन्यांना त्यांची कामे करण्यासाठी तुमच्याबद्दलच्या माहितीची गरज पडू शकते. या कंपन्यांना आम्ही देत असलेला वैयक्तिक डेटा या गोपनीयता विधानांतर्गत आम्ही तुम्हाला सूचित केलेल्या उद्देशाशिवाय इतर कशासाठीही वापरण्याचे अधिकार या कंपन्यांना नसतील.
iii. वैयक्तिक डेटा परदेशात हस्तांतरित करणे:
सिंजेंटा आणि तिच्या सहाय्यक कंपन्या आणि संलग्न संस्था जागतिक व्यवसायात आहेत आणि भिन्न देशांमध्ये त्यांच्या सुविधा व डेटाबेस आहेत. या गोपनीयता विधानात वर्णन केलेल्या उद्देशांसाठी, सिंजेंटा आणि तिच्या सहाय्यक कंपन्या आणि संलग्न संस्था, वेळोवेळी, तुमचा वैयक्तिक डेटा दुसऱ्या देशात असलेल्या सिंजेंटाच्या, संलग्न संस्था, सहाय्यक कंपनी किंवा त्रयस्थ-पक्षाच्या डेटाबेसमध्ये हस्तांतरित करू शकतात. जेव्हा सिंजेंटा असे करते तेव्हा, तुमच्या वैयक्तिक डेटाची गोपनीयता व सुरक्षा यांचे संरक्षण करण्यासाठी सिंजेंटा लागू होणाऱ्या कायद्यानुसार वाजवी सावधगिरी बाळगेल.
iv. इतर प्रकरणांमध्ये वैयक्तिक डेटाचे हस्तांतरण:
"वरील बाबींशिवाय, अशा काही इतर, मर्यादित परिस्थिती असू शकतात, ज्यांमध्ये सिंजेंटा किंवा तिच्या सहाय्यक कंपन्या किंवा संलग्न संस्था त्यांच्या डेटाबेसमध्ये असलेला वैयक्तिक डेटा, एखाद्या असंबंधित त्रयस्थ पक्षासह सामायिक करू शकतात किंवा त्यांच्याकडे हस्तांतरित करू शकतात, उदाहरणार्थ, कायदेशीर आवश्यकतेचे पालन करण्यासाठी आणि/किंवा न्यायाच्या प्रशासनासाठी आणि/किंवा तुमच्या किंवा तुमच्या कंपनीच्या महत्त्वाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि/किंवा कॉर्पोरेट विक्री, विलिनीकरण, पुनर्संघटन, विसर्जन किंवा अशाप्रकारच्या घटनांमध्ये.
जिथे योग्य असेल तिथे, त्रयस्थ पक्षाकडे वैयक्तिक डेटा उघड करण्यापूर्वी, अनधिकृत वापर किंवा प्रगटीकरणापासून त्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी त्रयस्थ पक्ष पुरेशी सावधगिरी बाळगेल याबाबत सिंजेंटा त्यांच्याकडून करार करून घेईल. या काटेकोरपणे नियंत्रित शर्तींच्या अंतर्गत जर सिंजेंटाने तुमचा वैयक्तिक डेटा त्रयस्थ पक्षांसह सामायिक करू नये, असे तुम्हाला वाटत असेल, तर कृपया आमच्या वेबमास्टरद्वारे आम्हाला सूचित करा."
डेटा प्रामाणिकता आणि सुरक्षा:
आमच्या डेटाबेसमधील वैयक्तिक डेटाची विश्वसनीयता, अचूकता, पूर्णत्व आणि चलन कायम राखण्यासाठी आणि आमच्या डेटाबेसच्या सुरक्षेचे संरक्षण करण्यासाठी सिंजेंटा व्यावसायिकरित्या वाजवी उपाययोजना करेल. तुमचा वैयक्तिक डेटा आम्ही ज्या उद्देशांसाठी गोळा केला आहे, त्यासाठी किंवा लागू होणाऱ्या कोणत्याही कायदेशीर अहवाल देण्याच्या किंवा दस्तऐवज राखून ठेवण्याच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी वाजवीपणे आवश्यक असेल तोपर्यंत ठेवतो. आमचे सर्व्हर्स आणि आमचे डेटाबेस उद्योगातील प्रमाणित सुरक्षा तंत्रांद्वारे संरक्षित आहेत, जसे की उद्योगातील प्रमाणित फायरवॉल्स आणि पासवर्ड संरक्षण. ज्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक डेटा पाहण्याची परवानगी असते, त्यांना असा डेटा योग्य प्रकारे आणि आमच्या सुरक्षा प्रोटोकॉल्सनुसार हाताळण्यासाठी प्रशिक्षित केलेले असते. डेटाचे नुकसान, गैरवापर, अनधिकृत प्रगटीकरण, फेरबदल किंवा नाश याबाबत जरी आम्ही हमी देऊ शकत नसलो, तरी अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
तुमच्या स्वतःच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे :
कृपया लक्षात ठेवा की जेव्हा कधी तुम्ही स्वेच्छेने वैयक्तिक डेटा ऑनलाईन उघड करता - उदाहरणार्थ संदेश फलकांवर, ईमेलद्वारे किंवा चॅट क्षेत्रांत, तेव्हा ती माहिती इतरांकडून घेतली आणि वापरली जाऊ शकते. शेवटी तुमच्या पासवर्ड्स आणि/किंवा खात्याच्या कोणत्याही माहितीची गुप्तता राखण्यास तुम्ही स्वत:च पूर्णपणे जबाबदार असता.
डेटा पाहणे आणि दुरुस्त्या :
डेटा गोपनीयता अधिकाऱ्याशी संपर्क करून या साईटद्वारे गोळा केलेला वैयक्तिक डेटा पाहण्याची व त्यात दुरुस्ती करण्याची तुमची इच्छा असू शकते. तुमचा वैयक्तिक डेटा ओळखण्यासाठी आम्हाला परवानगी देण्याकरिता कृपया पुरेशी माहिती प्रदान करा. तत्पर व योग्य मार्गाने आम्ही तुमच्या विनंतीला प्रतिसाद देऊ. तथापि, वैयक्तिक डेटात दुरुस्ती करण्याच्या किंवा तो हटवण्याच्या विनंत्या सिंजेंटावर लावलेल्या लागू होणाऱ्या कायदेशीर आवश्यकता किंवा दस्तऐवज राखून ठेवण्याच्या दायित्वांच्या अधीन असतील.
मुले:
अठरा (18) वर्षांहून कमी वयाच्या मुलांकडून सिंजेंटा जाणीवपूर्वक वैयक्तिक डेटा गोळा करत नाही. तुम्ही अठरा वर्षांहून कमी वयाचे असल्यास, कृपया आम्हाला कोणताही वैयक्तिक डेटा देऊ नका. अठरा वर्षांहून कमी वय असलेल्या, एखाद्या मुलाने या साईटद्वारे सिंजेंटाला वैयक्तिक डेटा दिला आहे असे मानण्याचे तुमच्याकडे कारण असल्यास, कृपया आमच्या डेटा गोपनीयता अधिकाऱ्याद्वारे आमच्याशी संपर्क साधावा आणि तो वैयक्तिक डेटा आमच्या डेटाबेसमधून हटवण्याचा आम्ही प्रयत्न करू.
इतर वेबसाईटच्या हायपरलिंक्स
i. सहाय्यक कंपन्या आणि संलग्न संस्थांच्या हायपरलिंक्स:
हे गोपनीयता विधान केवळ www.syngenta.co.in ला लागू होते. सिंजेंटा आणि तिच्या सहाय्यक कंपन्या आणि संलग्न संस्था विविध उद्देशांसाठी आणि विविध देशांमध्ये अनेक भिन्न प्रकारच्या वेब साईट्स हाताळतात जिथे भिन्न कायदे लागू असू शकतात. जर सिंजेंटा किंवा तिच्या सहाय्यक कंपन्या किंवा संलग्न संस्थाद्वारे चालवल्या जाणाऱ्या दुसऱ्या वेब साईटला तुम्ही भेट दिली, तर कृपया क्षणभर वेळ काढा आणि त्या साईटद्वारे कोणता वैयक्तिक डेटा संकलित केला जाईल आणि त्यावर कशी प्रक्रिया केली जाईल हे जाणून घेण्यासाठी गोपनीयता विधानाचा आढावा घ्या.
ii. तृतीय पक्षाच्या वेब साईट्सच्या हायपरलिंक्स:
या साईटवर अशा वेब साईट्सच्या हायपरलिंक्स असू शकतात, ज्यांचे सिंजेंटा किंवा तिच्या सहाय्यक कंपन्या आणि संलग्न संस्थांपैकी एकीद्वारे परिचालन केले जात नाही. या हायपरलिंक्स केवळ तुमच्या संदर्भासाठी व सोयीसाठी प्रदान केल्या जातात आणि या त्रयस्थ-पक्ष वेब साईट्सच्या उपक्रमांना मान्यता असल्याचे सूचित करत नाहीत किंवा त्यांच्या चालकांशी कोणताही संबंध असल्याचे सूचित करत नाहीत. सिंजेंटा या वेब साईट्स नियंत्रित करत नाही आणि त्यांच्या डेटा पद्धतींसाठी जबाबदार नाही. तुम्ही भेट देत असलेल्या कोणत्याही वेब साईटचा वापर करण्यापूर्वी किंवा स्वतःचा कोणताही वैयक्तिक डेटा प्रदान करण्यापूर्वी तुम्ही वेब साईटवर पोस्ट केलेल्या गोपनीयता विधान/धोरणाचा आढावा घ्यावा अशी आम्ही कळकळीने विनंती करतो.
आमच्या गोपनीयता विधानाबाबत प्रश्न
या गोपनीयता विधानाबाबत तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील किंवा तुमच्या वैयक्तिक डेटावर www.syngenta.co.in कशी प्रक्रिया केली जाते याबाबत काही चिंता असतील, तर कृपया आमच्या डेटा गोपनीयता अधिकाऱ्याद्वारे आम्हाला सूचित करा. :